आसाम मधल्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षांना मनमोहन सिंग यांची आठवण; मोदींवर विश्वासघाताचा आरोप!!
आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षांना आज अचानक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण काढली.