सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात पुरोहित संघाला घेणार विश्वासात; नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे आश्वासन
नाशिक शहर आणि विशेषतः रामतीर्थ, पंचवटी परिसराच्या विकासात पुरोहित संघाचे योगदान मोलाचे असून या संघाला विश्वासात घेऊनच कुंभमेळ्याचे नियोजन केले जाईल, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केले.