Manisha Kayande : जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर- ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत; सार्वजनिक ठिकाणी त्रास नको!
मुंबईच्या दादरच्या कबुतरखान्यावरून वाद चांगलाच चिघळला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी सरकारला आव्हान दिले आहे. धर्माच्या विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख केला.