Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ला; आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद, 4 जखमी
शुक्रवारी संध्याकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले, तर चार जण जखमी झाले. जखमींना पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी रिम्स रुग्णालयात नेले. घटनेनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.