mohan bhagwat : सरसंघचालक म्हणाले- मुस्लिम-ख्रिश्चनांनी भारतीय संस्कृती स्वीकारली तर तेही हिंदू, हिंदुत्वाला सीमा नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, हिंदुत्व हे सीमांमध्ये मर्यादित नाही, तर ते सर्वसमावेशक आहे. जर मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक या देशाची पूजा करतात, भारतीय संस्कृतीचे पालन करतात आणि त्यांच्या परंपरा आणि रीतिरिवाज जपून राष्ट्रावर श्रद्धा ठेवतात, तर ते देखील हिंदू आहेत.