Kalpana Bhagwat : बनावट आयएएस महिलेवर पाकसाठी हेरगिरीचा संशय; बॉम्बस्फोट काळात दिल्ली, उदयपूर, मणिपूरचा प्रवास
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले.