माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा, पण पार्थच्या जमीन घोटाळ्यात नैतिकता टांगली खुंटीला!!
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा आली, पण पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात तीच नैतिकता त्यांनी खुंटीला टांगून ठेवली.नाशिक मधले मुख्यमंत्री कोट्यातून चार फ्लॅट लाटल्ययाप्रकरणी माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ५०००० दंड ठोठावला. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिसांनी त्या अटक वॉरंट वर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. त्यामुळे भाजपने माणिकरावांवर दबाव वाढविला. या राजकीय दबावातून त्यांना राजीनामा देणे भाग पडले. तो राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा अजितदादांनी स्वतःकडे ठेवून घेतला होता.