Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पद सोडले; म्हणाल्या- मी लहानपणापासूनच साध्वी, भविष्यातही राहीन
किन्नर आखाड्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून याची घोषणा केली. ममता म्हणाल्या, आज किन्नर आखाड्यात माझ्याबद्दल वाद सुरू आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि भविष्यातही साध्वी राहीन.