ममतांच्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाचा दणका; 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ!!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने 2016 साली केलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त दणका दिला. त्यामुळे तब्बल 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ आली. शिक्षक भरती प्रक्रियेत सरकारने नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये वशिलेबाजी, लाचखोरी असे गैरव्यवहार आणि गैरप्रकार केले.