Mamata Banerjee : मुलींनी रात्री बाहेर पडू नये!” दुर्गापूर बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे धक्कादायक विधान महिला संघटना आणि विरोधकांचा संताप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूर येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या —“मुलींनी रात्री कॉलेजच्या बाहेर जाऊ नये, त्यांनाही स्वतःचे रक्षण करावे लागेल.”