Assembly Polls : बंगालमध्ये मतदानाचा नवा विक्रम, पहिल्या टप्प्यात 92% मतदान; ममता म्हणाल्या – SIR च्या विरोधात प्रचंड मतदान
गुरुवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. बंगालमध्ये २९४ पैकी १५२ जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदानात ९२.१०% मतदानाची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४.९५% मतदान झाले.