Maldives Nasheed : भारत नसता तर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असती; मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांची प्रतिक्रिया
मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी म्हटले आहे की, जर भारत नसता तर आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असती. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, नशीद म्हणाले की, त्यांच्या देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट झाली आहे की जर भारताने वेळेवर मदत केली नसती तर मालदीव दिवाळखोरीत गेला असता.