Major Agreements : आता सेशेल्समध्येही UPI ने पेमेंट होईल; भारतासोबत 19 मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब, 1250 कोटींचे कर्जही मिळणार
भारत आणि सेशेल्सने रविवारी 19 मोठ्या करारांची आणि विकास प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधान मोदी आणि सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयामुळे संरक्षण, डिजिटल पेमेंट, आरोग्य, शिक्षण, अंतराळ आणि सागरी सुरक्षा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होईल.