Hamid Ansari : माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांनी गझनवीला भारतीय लुटारू म्हटले; भाजपने म्हटले- ही विकृत मानसिकता, काँग्रेसला गझनवीच्या 17 हल्ल्यांवर पांघरूण घालायचे आहे का?
माजी उपराष्ट्रपती एम. हमीद अन्सारी यांनी महमूद गझनवीला ‘भारतीय लुटारू’ म्हटले. यावर भाजपने शुक्रवारी आरोप केला की, परदेशी आक्रमक आणि लुटारूंबद्दल अन्सारींना असलेले प्रेम त्यांची “विकृत मानसिकता” दर्शवते.