Mahesh Sharma : जलतज्ञ पद्मश्री महेश शर्मांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा गोदा जीवन गौरव पुरस्कार; 7 फेब्रुवारीला राज्यपालांच्या हस्ते सन्मान!!
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने यंदाचा गोदा जीवन गौरव पुरस्कार जलतज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना घोषित करण्यात आला आहे. दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी गोदा आरती नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.