आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना एक हात मदतीचा – 100 गाईंच्या दान संकल्पाचा; भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम
अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या संसारावर संकट कोसळलं आहे. पण त्यांचा आत्मविश्वास अजूनही ठाम आहे. राज्यातल्या फडणवीस सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज देखील जाहीर केले आहे. पण त्याचवेळी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे एका अनोख्या संकल्पासह मदतीसाठी पुढे आले आहेत. आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना ते 100 गाई देणार आहेत.