• Download App
    Mahayuti | The Focus India

    Mahayuti

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे, पवार यांच्यासह तब्बल 20 नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये; राज्य निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

    राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांतच चढाओढ दिसून आली. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या आणि टीकाटिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू असताना मतदारांना प्रलोभने देणारी महायुतीतील बड्या नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह एकूण २० जणांच्या भाषणांची निवडणूक आयोगाकडून तपासणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.

    Read more

    Ramdas Athawale : रामदास आठवलेंचे स्वबळावरचे संकेत; म्हणाले- युतीत जागेसाठी भीक मागावी लागते, शिवसेना-NCP चा पर्याय खुला

    राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रंग चांगलाच चढलेला असताना, महायुतीतीलच मित्र पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी केलेल्या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त केली.

    Read more

    Ajit Pawar ; तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे; ‘तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे’ या वक्तव्यावरून अजित पवारांची सारवासारव

    माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत,” या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. “ते विधान मी ओघात बोललो होतो. तिजोरी माझ्या किंवा कुणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे. तसेच माझ्यापेक्षा जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच आहेत,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

    Read more

    Chandrashekhar Bawankule, : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.

    Read more

    Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- अजित पवारांवर सत्ता सोडण्याची वेळ आणली जाईल; महायुतीत पहिला आघात राष्ट्रवादीवर होईल

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    Read more

    Eknath Shinde : आगामी निवडणुका महायुतीत लढण्याची भूमिका ठेवा; शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत, एकनाथ शिंदेंचे आपल्या मंत्र्यांना आदेश

    राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढवण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. तसेच जिथे जुळून येत नसेल, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढण्याचेही आदेश शिंदेंनी मंत्र्यांना दिलेत.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- रवींद्र धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता; आपली भूमिका भाजपविरोधी नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले

    पुण्यातील जैन बोर्डिंग भूखंडाच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणावरून धंगेकर चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते असून, त्यांना “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही,” असा सल्ला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    Read more

    पुण्यात महायुतीतले संबंध खारट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा धंगेकरांना निरोप, महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये; पण धंगेकर कुणाचे ऐकणार??

    पुण्यामध्ये महायुती मधले संबंध पुरते खारट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना निरोप पाठविला, महायुती मिठाचा खडा पडता कामा नये!! पण तोपर्यंत धंगेकरांना महायुतीत काय करायचे होते, ते करून झाले होते.

    Read more

    Uday Samant : उदय सामंतांचा इशारा- आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवू, कोणी जास्त खुमखुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू

    आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे

    Read more

    Dattatray Bharne : दत्तात्रय भरणे म्हणाले- राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज; पक्ष सोडून गेलो तरी पक्षाला फरक पडणार नाही

    भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    Read more

    Mahayuti MLA Sanjay Gaikwad : आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही; लोकप्रिय योजनांचा फटका, संजय गायकवाड यांचा दावा; मंत्री सरनाईकांनी फेटाळला

    महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

    Read more

    Mahayuti महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून महायुतीत फुट पडणार?

    पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना तयार करतांना भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या निर्णयांमुळे, येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर ११० जागा जिंकण्यासाठी जाळं विणल्याचा आरोप भाजपवर केला जातोय. तसंच यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. 

    Read more

    Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे

    सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांना ताकीद; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देऊ नका!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे.

    Read more

    दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!

    दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!, असेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकार बाबत घडताना दिसले.

    Read more

    Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंनी महायुतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहावे; रामदास आठवले यांचे मत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Ramdas Athawale महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असणे स्वाभाविक आहे. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची पुन्हा संधी मिळणार की नाही, अशी त्यांना शंका आहे. […]

    Read more

    Mahayuti मुख्यमंत्रीपदी फडणवीस??; अमित शाहांच्या घरी झालेल्या बैठकीतल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेज वरून तर्कवितर्कांना उधाण!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Mahayuti महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजधानीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये कोणत्या नेत्यांची बॉडी लँग्वेज कशी होती, […]

    Read more

    Mahayuti : महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले ; मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

    महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची भाजप हायकमांडसोबत बैठक विशेष प्रतिनिधी मुंबई : Mahayuti  महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. […]

    Read more

    Congress : महायुतीच्या लाटेत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा धक्कादायक पराभव, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांसह नाना पटोलेंना जबर दणका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Congress बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. […]

    Read more

    Mahayuti : लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार; महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : Mahayuti महायुतीने आज कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा दहा कलमी जाहीरनामा देखील सादर केला आहे. […]

    Read more

    Mahayuti महायुतीचा मैत्रीपूर्ण लढतीचा पुणे पॅटर्न, खडकवासल्यात दत्ता धनकवडे तर वडगाव शेरीत जगदीश मुळीक लढणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : Mahayuti  पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघात महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचा पुणे पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. खडकवासला […]

    Read more

    ladki bahin yojana : लाडकी बहिणी योजनेचा महाराष्ट्रात महायुतीला फायदा नाही, पवारांचा दावा; मग हरियाणात काँग्रेसचे काय होईल??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लाडकी बहिणी योजना ( ladki bahin yojana ) सुरू करून शिंदे – फडणवीस सरकारने त्यांच्या खात्यांमध्ये दरमहा 1500 रुपये टाकायला सुरुवात […]

    Read more

    AI सर्वेक्षणात महायुती जोरात; लाडक्या बहिणींनी घालविला महाविकास आघाडीचा इम्पॅक्ट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा हुरूप वाढला, पण लोकसभा निवडणुकीनंतरच्या दोन सर्वेक्षणांमधून मात्र महायुतीसाठी गुड […]

    Read more

    ‘…तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील’ मुख्यमंत्री शिंदेंचं महायुतीच्या मेळाव्यात विधान!

    ’एकजुटीने लढुया आणि एकजुटीने जिंकुया’ असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. विशेष प्रतिनिधी मुंबई : शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा […]

    Read more