Mahayuti candidates : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर; शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, भाजपकडून 3 नेत्यांना संधी
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पाच पैकी तीन जागांसाठी भाजपने काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली.