Raj Thackeray : राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंचेच नुकसान; रामदास आठवलेंचा दावा, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. “राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंना फायदा नाही, तर त्यांचे नुकसानच होईल. यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल,” असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.