Raj Thackeray : मोर्चा असा काढा की गल्ली ते दिल्लीचे लक्ष मुंबईकडे लागेल, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश; निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.