Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांची सावरकरांवर आक्षेपार्ह टीका; म्हणाले- गांधीहत्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता
महात्मा गांधीजींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता आणि नथुराम गोडसे हाच पहिला दहशतवादी होता,’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही अप्रत्यक्ष आणि आक्षेपार्ह टीका करत, ‘गांधी हत्येच्या कटातील सहआरोपी ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारा होता,’ असा गंभीर आरोप केला आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.