Property Seizure : घर खरेदीदारांची फसवणूक केल्यास बिल्डरांच्या मालमत्ता होणार जप्त; राज्य सरकारची कडक पावले
राज्यात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि महारेराच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांविरुद्ध ( बिल्डर) आता राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. गृहखरेदीदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विकासकांच्या मालमत्तांचा लिलाव करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे व इतर सदस्यांन