Maharashtra : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठी मदत; कराचे आगाऊ 6 हजार 418 कोटी हस्तांतरित
सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्य सरकारांना कराचा आगाऊ हप्ता हस्तांतरित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला 6 हजार 418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त असून, राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने करण्यात आले आहे.