Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना जि. प. च्या मतदानापूर्वीच मिळणार लाभ; सामाजिक न्याय विभागाचा 393 कोटींचा निधी वितरित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना डिसेंबरचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींना डिसेंबर २०२५ चा लाभ मतदानापूर्वीच खात्यात जमा होणार आहे. तसेच तांत्रिक चुकांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.