Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले- वाद टाळण्यासाठी शरद पवारांच्या नावाला संमती दिली, आता मोठी प्रतीक्षा करावी लागणार
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी महाविकास आघाडीतील (मविआ) अंतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. “मविआमध्ये सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष असूनही आम्हाला डावलून तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला संधी मिळाली,” अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. या निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आता २०२९ पर्यंत पुन्हा संधी मिळणे कठीण असल्याचे सांगत त्यांनी आपली सल व्यक्त केली.