• Download App
    Maharashtra Rajya Sabha election March 16 | The Focus India

    Maharashtra Rajya Sabha election March 16

    Sharad Pawar : शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता भरला उमेदवारी अर्ज; निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन प्रक्रिया केली पूर्ण

    राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.

    Read more

    BJP Rajya Sabha : राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर; महाराष्ट्रातून विनोद तावडे, आठवले, वडकुते, इवनाते यांना उमेदवारी, जाणून घ्या या नेत्यांबद्दल

    राज्यसभेसाठी भाजपने आज उमेदवार यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे.

    Read more

    Supriya Sule : राज्यसभेसाठी मविआतर्फे शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर पाठिंबा, सुप्रिया सुळेंची माहिती

    राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही अधिकृत घोषणा केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सोशल मीडियाद्वारे महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार उद्या स्वतः अर्ज भरण्यासाठी विधानमंडळात जाण्याची शक्यता कमी असून, निवडणूक अधिकारी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    MVA Rajya Sabha : आज ठरणार मविआचा राज्यसभेचा उमेदवार; दुबईतील भारतीयांना परत आणण्याची विजय वडेट्टीवारांची मागणी

    राज्यसभेच्या जागेसाठी आज मविआतील 3 पक्षांची बैठक होणार आहे. ती माहिती आम्ही दिल्लीला पाठवू. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मविआचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल. अद्याप कोणतेही नाव अंतिम झालेले नाही, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तर आम्हाला राज्यसभा आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची जागा घ्यावी, असा आमचा आग्रह होता, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Read more