Maharashtra Rain Fury : राज्यात पावसाचा धुमाकूळ; धरणसाठा 26 टक्क्यांवर, मुंबईत ढगफुटीसदृश परिस्थिती, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर
राज्यभर मान्सूनने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे आणि तलाव तुडुंब भरून वाहत असून धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 26.42 टक्क्यांवर पोहोचला असून आगामी काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.