• Download App
    Maharashtra Rain Alert | The Focus India

    Maharashtra Rain Alert

    Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस? वाचा सविस्तर

    जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच भारतीय हवामान विभागाने आपला नवा अंदाज वर्तवला असून, त्यानुसार पुढील 48 तासांत संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    Read more