Ajit Pawar : ‘आता तिजा होऊ देणार नाही’, कृषिमंत्री कोकाटेंवर अजित पवारांचे कारवाईचे स्पष्ट संकेत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील ऑनलाईन रमी प्रकरणी लवकरच कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, याआधीही त्यांनी कोकाटेंना योग्य इशारा दिला होता की ‘इजा-बिजा झाली, तिजा होऊ देऊ नका’. मात्र आता पुन्हा एकदा प्रकरण घडल्याने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.