Chhagan Bhujbal : विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला; महाएल्गार सभेतून छगन भुजबळांचा हल्लाबोल
विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महाएल्गार सभेत बोलताना केली आहे. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.