Raosaheb Danve, : ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, त्यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते उरणार नाहीत, रावसाहेब दानवेंची टीका
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असून, यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते उरणार नाहीत, असे भाकीत दानवे यांनी वर्तवले. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारची पाठराखण करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.