Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा; ACB नंतर आता EDच्या प्रकरणातही निर्दोष सुटका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) छगन भुजबळ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासाअंती आता ईडीने छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे.