Prakash Ambedkar : शरद पवारांच्या नादी लागणे म्हणजे दाऊदच्या नादी लागणे, प्रकाश आंबेडकरांची कॉंग्रेसवरही खोचक टीका
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे.