• Download App
    Maharashtra Politics February 2026 | The Focus India

    Maharashtra Politics February 2026

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- NCPच्या विलीनीकरणाचा कोणताही मुद्दा नव्हता; सुनेत्रा पवारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य

    सुनेत्रा पवार यांचा शपथविधीला इतकी का घाई का झाली त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसेच विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात आली. का सतत मुलाखतीला फेरा सुरू ठेवण्यात आला? विलीनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कसा संबंध येतो हे जर मला सांगितले तर मी माझी भूमिका मांडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Amol Mitkari : पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत; अमोल मिटकरींचं वक्तव्य; म्हणाले- राजकारणापेक्षा पक्ष सावरणे गरजेचे

    मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

    Read more