• Download App
    Maharashtra Politics Feb 2026 | The Focus India

    Maharashtra Politics Feb 2026

    Amit Satam : हर्षवर्धन सपकाळांनी नाक घासून माफी मागावी; भाजप नेते अमित साटम यांची मागणी, म्हणाले- हा शिवप्रेमींच्या श्रद्धेवर घाला

    कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावरून भाजपने कॉंग्रेससह सपकाळ यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. भाजप नेते अमित साटम यांनी ट्विट करत सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. सपकाळ यांनी तात्काळ नाक घासून माफी मागावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.

    Read more

    Anil Deshmukh : अनिल देशमुख म्हणाले- गडकरींना खासगी विमानाने प्रवास टाळण्यास सांगणार, अजित पवारांच्या अपघातावरही उपस्थित केले प्रश्न

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, आता बड्या नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक महत्त्वाचा आणि मित्रत्वाचा सल्ला देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. “अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असून, नितीन गडकरी यांनी आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करणे टाळावे. असे सांगणार आहे.” असे अनिल देशमुख म्हणालेत.

    Read more