Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार- मी खरा वाघ, त्यांच्यासारखा कागदी नाही, माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागले
राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निवडणूक निकालांवरून जोरदार निशाणा साधला. माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली, असे दानवे यावेळी म्हणाले.