• Download App
    Maharashtra Political News February 2026 | The Focus India

    Maharashtra Political News February 2026

    Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाला- रोहित पवार यांचा आरोप; VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त

    अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी; चौकशीची मागणी; वाल्मीक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धमकी देणारा व्यक्ती कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. दिव्य मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.

    Read more

    Anil Deshmukh : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजितदादांची शेवटची इच्छा; दादा, सुप्रिया सुळे अन् तटकरेंमध्ये बैठक झाली होती, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी सगळे ठरले होते. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळेंची बैठक झाली होती. जयंत पाटलांच्या घरी पहाटेपर्यंत बैठका चालल्या,” असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अजितदादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी घातली.

    Read more