• Download App
    Maharashtra political crisis updates | The Focus India

    Maharashtra political crisis updates

    Bhaskar Jadhav : ‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more