• Download App
    Maharashtra News | The Focus India

    Maharashtra News

    CM Fadnavis : तरुण डॉक्टरची आत्महत्या दु:खद; आरोपींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

    Read more

    Gunratna Sadavarte : मुंबई ST बँकेतील हाणामारीवर गुणरत्न सदावर्ते संतप्त; आदिवासी महिलेला बेअब्रू करण्याचा आरोप

    मुंबई एसटी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे.

    Read more

    Mumbai : मुंबई एसटी बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा; गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

    एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत.

    Read more

    ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचलही मिळणार

    राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.

    Read more