Chandrashekhar Bawankule : बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा; यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल
बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले.