Maharashtra Monsoon : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पालघरला ‘रेड’ तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज’ अलर्ट
राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर केला असून, विशेषतः कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी प्रशासनाकडून विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.