Maharashtra-Karnataka : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बैठक; 30 वर्षांनंतर अधिवेशन काळात विधानभवनात शरद पवारांची उपस्थिती, न्यायालयीन लढा अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात उच्चाधिकार समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सीमा भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, अधिवेशन काळात तब्बल 30 वर्षांनंतर शरद पवार विधानभवनात दाखल झाले.