Ajit Pawar : सरकारचा मोठा निर्णय; अजित पवार विमान दुर्घटनेच्या CID चौकशीचे आदेश; अपघातस्थळावर प्रवेश बंदी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 तारखेला, बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.