Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींवरून विधानसभेत विवाद; विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांचा बहिणींच्या नादी न लागण्याचा इशारा
राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा विधिमंडळात गाजली. आज (बुधवार, १० डिसेंबर) हिवाळी अधिवेशनादरम्यान या योजनेतील कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी केवायसी प्रक्रिया आणि बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिती तटकरे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत विरोधकांवर जोरदार पलटवार केला.