Sunetra Pawar : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार; पद स्वीकारण्यास होकार; राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज महत्त्वाची बैठक
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, अशी चर्चा सुरू झाली असून यात सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे समजते. तसेच शनिवारीच सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.