CM Fadnavis : अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा; :2030 पर्यंत राज्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचे लक्ष्य
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडल्याचे दिसून आले. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे विरोधकांनी उचलून धरले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या आहेत तसेच त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पाहुयात.