CM Devendra Fadnavis : सोशल मीडियातील बदनामीवर सरकार कठोर; कायदेशीर तरतुदी तपासण्यासाठी DGच्या नेतृत्वात समिती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामीविरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारला या प्रकरणी एखादा नवा कायदा किंवा आहे त्याच कायद्यात एखादी दुरुस्ती करण्याची गरज आहे काय? हे पडताळून तशी शिफारस सरकारला करेल, असे ते म्हणालेत. सरकारच्या या घोषणेमुळे सोशल मीडियातील बदनामीकारक मजकुराला लगाम घातला जाण्याची शक्यता आहे.