Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू; AAIB संस्थेने घेतली जबाबदारी, CM देवेंद्र फडणवीसांच्या पत्राची केंद्राकडून दखल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीच्या विमानतळावर लँड करत असतानाच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता याची चौकशी एएआयबी या संस्थेने सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.