Uttarakhand : उत्तराखंडमध्ये भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, यात महाराष्ट्रातील एकाचा समावेश
उत्तराखंडमधील टिहरी येथे भाविकांनी भरलेली बस 70 मीटर खोल दरीत कोसळली, ज्यात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. टिहरीचे एसपी आयुष अग्रवाल यांनी याची पुष्टी केली. दुपारी सुमारे साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीचे 13 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.