• Download App
    Maharashtra Civic Polls | The Focus India

    Maharashtra Civic Polls

    Nashik Municipal Election : नाशिककरांचे भाजपला दुसऱ्यांदा बहुमत; शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मैत्रीपूर्ण आव्हान परतवले

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता राखण्यात भाजप पूर्णत: यशस्वी ठरला. १२२ जागांच्या महापालिकेत तब्बल ७२ जागा जिंकून पक्षाने एकहाती सत्ता मिळवण्यात सलग दुसऱ्यांदा यश प्राप्त केले. त्याच वेळी भाजपला आव्हान देऊ पाहणारे राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने पूर्ण जागांवर उमेदवार देत दिलेली मैत्रीपूर्ण लढत अपयशी ठरली. विशेषत: उद्धव व राज यांनी ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून एकत्र येत राज्यातील पहिली संयुक्त प्रचारसभा नाशिकमध्ये घेत मैदान मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले.

    Read more

    BMC Elections : काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर; जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

    काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे.

    Read more

    Sanjay Raut : अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही; दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावरून संजय राऊतांचा इशारा

    राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.

    Read more